शिवसेना सोडण्याआधी राज ठाकरे काय मागत होते, मी साक्षीदार आहे, म्हणत, मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान, म्हणाले…

0
536

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

रत्नागिरी : जिल्ह्याच्या खेड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह आपल्याला पक्षातून बाहेर का पडावं लागलं? यावरही एकनाथ शिंदे यांनी यावेळी भाष्य केलं.

शिवसेना सोडण्याआधी राज ठाकरे काय मागत होते? जिथे शिवसेना नाही. जिथे शिवसेना कमजोर आहे, तो भाग मला द्या. मी शिवसेना वाढवतो आणि मोठी करतो. नारायण राणेंचा काय गुन्हा आहे? त्यांच्या बाबतीत काय झालं? राज ठाकरेंनी काय मागितलं होतं? याचे आम्ही सगळे साक्षीदार आहोत., असं विधान एकनाथ शिंदेंनी यावेळी केलं.

हे ही वाचा : “ठाकरेंचा शिंदेना पुन्हा दणका, शिंदे गटात प्रवेश केलेल्या ‘या’ शिवसैनिकांची गृहवापसी”

दरम्यान, जेव्हा ठाण्याच्या महापौरपदाची निवडणूक होती. तेव्हा मी राज ठाकरेंच्या घरी गेलो. त्यांना सांगितलं की हा भगवा बाळासाहेब ठाकरेंनी फडकवला आहे. आनंद दिघेंच्या मार्गदर्शनाखाली फडकला आहे, हा भगवा उतरू देऊ नका. तेव्हा राज ठाकरेंनी आमची विनंती मान्य केली आणि आम्हाला पाठिंबा दिला. यात आमचं काय चुकलं? पण तेही तुम्हाला पटलं नाही. शेवटी बाळासाहेबांनी सांगितलं की हा एकनाथ स्वत:साठी गेला नाही, ठाण्यातला भगवा उतरू नये म्हणून गेला., असं शिंदे म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

“मुख्यमंत्री शिंदेंच्या कामामुळे समाधानी; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्याकडून स्तुतीसुमने, चर्चांना उधाण”

“ठाकरी तत्त्व, मराठी सत्त्व आणि…; राज ठाकरेंचा पाडव्याचा टीझर जाहीर, पहा व्हिडिओ”

“उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावावरती महाराष्ट्रात पुन्हा चमत्कार घडवू; ‘या’ आमदाराचा दावा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here