शरद पवारांसोबतच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?; नाना पटोलेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

0
376

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काँग्रेसच्या नेत्यांनी आज मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत काय चर्चा होणार? यावरून अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. या बैठकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत या बैठकीबाबतची माहिती दिली.

आजच्या बैठकीत शरद पवार यांनी विरोधी पक्षांच्या बंगळुरू आणि पाटण्यातल्या बैठकांमधला अनुभव सांगितला. मुंबईत होणाऱ्या बैठकीत अजून काय चांगलं करता येईल, याबाबत शरद पवार यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. तसेच यावेळी शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून बातचित केली., असं नाना पटोलेंनी यावेळी सांगितलं.

ही बातमी पण वाचा : ‘इर्शाळवाडी ग्रामस्थांनी आठ वर्षांपूर्वीच…’; मनसेचं ट्वीट चर्चेत

5 ऑगस्टनंतर किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ची (INDIA) मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीच्या पूर्वतयारीसाठी आम्ही आज शरद पवार यांना भेटलो. महाविकास आघाडी या बैठकीचं आयोजन करेल., असं नाना पटोले म्हणाले.

पुढच्या शनिवारी सकाळी 11 वाजता ‘इंडिया’च्या बैठकीच्या पूर्वतयारीसाठी आम्ही पुन्हा एक बैठक घेणार आहोत. सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीला अनेक राज्यांचे मुख्यमंत्री येतील, वेगवेगळ्या राज्यांमधील पक्षांचे नेते येतील. या बैठकीसाठी 100 पेक्षा जास्त मोठमोठे नेते मुंबईत येतील. असा अंदाज आहे.. असंही नाना पटोले म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

“100 कोटींची माती, मुंबई-पुणे एक्सप्रेसवर पुन्हा दरड कोसळली, मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत”

“राज ठाकरेंना टाळी देणार का?; उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले, प्रस्ताव आला तर…”

कोट्यवधींची जमीन हडप केल्याप्रकरणी भाजपच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here