आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
कल्याण | भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये कल्याण-डोंबिवली शहरात काही दिवसांपूर्वी मोठा वाद उफाळल्याची घटना घडली होती. अशातच आता मोठी बातमी समोर आली आहे.
कल्याण डोंबिवलीत भाजपचाच महापौर निवडून येईल, असं माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी म्हटलं आहे. तर कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटापुढे भाजपचं काही चालत नाही, असं मनसे आमदार राजू पाटील यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी राजू पाटील यांच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. “शिंदे गटाकडून भाजप कार्यकर्त्यांचं खच्चीकरण केलं जातंय”, असं आमदार गणपतराव गायकवाड म्हणाले आहेत.
ही बातमी पण वाचा : …तर या सरकारला ते महागात पडेल; मराठा महासंघाचा शिंदे – फडणवीस सरकारला इशारा
आमची जास्त संख्या असेल तर निश्चितच महापौर भाजपचा असेल. यावेळी आमचेच उमेदवार जास्त संख्येने निवडून येतील. कारण गेल्यावेळी खूप कमी मतांच्या फरकाने आमच्या बऱ्याच जागा गेल्या होत्या किंवा आपसातल्या मतभेदांमुळे आमच्या काही जागा गेल्या आहेत. यावेळेला त्या उणीवा भरुन काढून आमच्या जातीत जागा निवडून येतील असा आमचा विश्वास आहे”, अशी भूमिका मोरेश्वर भोईर यांनी मांडली. तर दुसरीकडे प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्याला वाटत असतं आमच्या पक्षाचा नेता महत्त्वाच्या पदावर बसला पाहिजे. आमचीदेखील तिच इच्छा आहे. मनसेचा महापौर बसावा, अशी आमचीदेखील इच्छा आहे. पण केडीएमसीत भाजपचं शिंदे गटापुढे काही चालेल असं मला वाटत नाही. असं राजू पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, राजू पाटील यांनी जो दावा केला ती खरी वस्तुस्थिती आहे. एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्याकडून महाराष्ट्रातील सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांचं खच्चीकरण सुरु आहे. वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. राजू पाटील जे बोलले ते सत्य आहे”, असं गणपत गायकवाड म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
शिवसेनेच्या या नेत्याच्या अडचणीत वाढ; बलात्कार प्रकरणातील जामीन रद्द
मोठी बातमी! महाराष्ट्र सरकारकडून कुणबी-मराठा आरक्षणाचा जीआर निघाला
“मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे”