आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे 40 आमदारांना घेऊन शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्यासह 8 आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे.
यानंतर राष्ट्रवादीत आता दोन गट पडले आहेत. एक शरद पवार गट, तर दुसरा अजित पवार गट. राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठिंब्याच्या पत्रावर सही केली आहे. अहिरे यांनी शपथविधीच्या दिवशी नेमकं काय घडलं तो घटनाक्रम सांगितला आहे.
ही बातमी पण वाचा : अजित पवार यांच्यासोबत युतीनंतर भाजप नेत्यांमध्ये नाराजीचा सूर
मला अजित पवारांनी बोलवलं होतं, त्यामुळे मी गेले होते. माझं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काम होतं. कारण त्यांच्याकडे उर्जा खातंही आहे. एकलहरा प्रकल्पाचा प्रश्न प्रलंबित आहे. अजित पवार विरोधी पक्षनेते असल्याने मी त्यांच्याकडे पाठपुरावा करत होते आणि त्यांच्या माध्यमातून एक बैठक नियोजित करुन द्या असं मी त्यांना सांगितलं. कार्यालयातून मला फोन आला की देवगिरी बंगल्यावर अजित पवार आहेत. मी कामानिमित्त गेले होते. तिथे सगळे आमदार सह्या करत होते त्यामुळे मी पण सही केली. अजित पवारांबरोबर मी राजभवनावर गेले. तिथे शपथविधी पार पडला. मी त्या कार्यक्रमालाही गेले होते. पण नंतर मी तिथून निघाले. त्यानंतर मी सुप्रिया सुळेंना भेटले. मी शरद पवार यांचीही भेट घेतली. माझी ट्रिटमेंट नाशिकला सुरु होती. त्यामुळे मी इथे आले आहे. तसंच माझं बाळही माझ्या बरोबर होते., असं अहिरे म्हणाल्या.
आमच्या पक्षाच्या नेत्यांवर आमचा आंधळा विश्वास आहे. त्यामुळे आम्ही आंधळेपणाने विश्वासाने सही केली होती. मी एकटीनेच सही केली नाही तर अनेक आमदारांनी सह्या केल्या. सह्या झाल्यानंतर जेव्हा राजभवनाकडे चला असं सांगितल्यावर थोडा मनात विचार आला की हे सगळं काय चाललं आहे? त्यानंतर मी दादांशी बोलले. त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. मी माझ्या मनातल्या संभ्रमाविषयी शरद पवार यांच्याशीही बोलले. जे काही झालं त्याला मी विश्वासघात म्हणणार नाही. मात्र जे काही झालं ते मी माझ्या मतदारसंघात बोलणार आहे त्यानंतर मी पुढचा निर्णय घेणार आहे, असंही अहिरे यांनी यावेळी सांगितलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
अजित पवार यांची शरद पवारांवर पहिल्यांदाच टीका; म्हणाले, तुम्ही…
शिवसेनेचे बंडखोर उद्धव ठाकरेंकडे परत जाणार, कारण…; भाजपच्या ‘या’ खासदाराचा मोठा दावा
“मी, शरद पवार साहेबांसोबतच; अजित पवारांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असणाऱ्या ‘या’ आमदाराचा निर्णय”