“विष कालवणाऱ्या माणसाने काय काम केलं?, एक खरबूज, टरबूज सोसायटी देखील नाही काढली पठ्ठ्यानं”

0
451

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिशिदीवरील भोंगांच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. काल 1 मे रोजी राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा पार पडली. या सभेत राज पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं.

ईद (3 मे) नंतर मशिदींवरचे भोंगे उतरले नाही तर 4 मे पासून बिना परवानगीचे भोंगे असलेल्या मशिदींसमोर दुप्पट आवाजात भोंगे लावून हनुमान चालिसा पठण झालेच पाहिजे, अशी राज यांनी या सभेत घोषणा केली. तसेच राज यांनी यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

शरद पवार यांनी जातीय व्देष निर्माण केला. त्यांनी निर्माण केलेली जातीयवादाची तेढ आता महाविद्यालयाच्या स्तरावरही पोहचली आहे. आपण जात- पात मानत नाही. पण राज्यात राष्ट्रवादी कॉग्रेसच्या जन्मानंतरच जातीय तेढ व द्वेष वाढल्याच्या आरोपही राज यांनी यावेळी केला. यावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : राज ठाकरेंच्या कालच्या भाषणावर खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

विष कालवणाऱ्या माणसाने काय काम केलं?, साधी दूध सोसायटी नाही काढली पट्ठ्यानं, एक खरबूज, टरबूज सोसायटी देखील नाही, संस्था चालवण्यास डोकं लागतं. धु़डगुस घालण्यासाठी अक्कल लागत नाही, असा टोला अजित पवारांनी राज ठाकरेंना लगावला. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, राज ठाकरेंचं जेवढं वय नाही, तेवढं पवार साहेबांचं राजकारण झालं आहे, असाही टोला अजित पवारांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

“जसं शेन वाॅर्नला स्वप्नात सचिन तेंडूलकर दिसायचा, तसं राज यांना शरद पवार दिसतात”

“राजकीय घडामोडींना वेग, ‘या’ निवडणूकीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपची आघाडी”

3 मे नंतर मशिदींवरचे भोंगे उतरले नाहीत तर…; औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंची मोठी घोषणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here