Home तंत्रज्ञान आमचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही; फेसबुक इंडियाचे वाईस प्रेसिडेंट अजित मोहन यांचं...

आमचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही; फेसबुक इंडियाचे वाईस प्रेसिडेंट अजित मोहन यांचं स्पष्टीकरण

257

नवी दिल्ली : भाजपा फेसबुक आणि व्हॉट्स अ‌ॅप नियंत्रित करत असून त्याद्वारे द्वेष पसरवत आहेत असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता. या आरोपवर फेसबुकने स्पष्टीकरण दिलं आहे.इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातले वृत्त दिलं आहे.

फेसबुक हे पारदर्शी, खुलं आणि निःपक्षपाती आहे, फेसबुक हा असा प्लॅटफॉर्म आहे जिथे लोक मुक्तपणे व्यक्त होऊ शकतात. गेल्या काही दिवसांपासून आम्ही आमची धोरणं कशी लागू करतो यावरुन आमच्यावर पक्षपात केल्याचा आरोप होतो आहे. तसंच काही पक्ष फेसबुकवर नियंत्रण ठेवत असल्याचाही आरोप झाला. मात्र यामध्ये काहीही तथ्य नाही. फेसबुक इंडियाचे वाईस प्रेसिडेंट आणि मॅनेजिंग डायरेक्टर अजित मोहन सांगितलं.

दरम्यान, आमचा कुठल्याही पक्षाशी काहीही संबंध नाही असंही डायरेक्टर अजित मोहन म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

वीज बिलात ग्राहकांना सूट मिळणार; राज्य सरकारचा प्रस्ताव तयार

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुणे न्यायालयाचा धक्का; दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

“विरोधकांच्या राजकारणामुळे मुंबई पोलिसांचं नाव खराब होतंय”

नोकरी गमावलेल्यांसाठी केंद्र सरकारकडून मोठा दिलासा; घेतला ‘हा’ मोठा निर्णय