तुमच्या धमक्यांना आम्ही फाट्यावर मारतो; निलेश राणेंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

0
149

मुंबई : मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक बेडूक आणि त्याची दोन पिल्लं शिवसेनेविरोधात ओरडत फिरत आहेत, असं म्हणत नाव न घेता राणे पितापुत्रांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. यावर भाजप आमदार निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

नेहमीप्रमाणे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फालतू आणि पोकळ भाषण केलं. मराठा व धनगर आरक्षणाबद्दल १ वाक्य पण बिहारवर २० मिनिट. उद्धव ठाकरे धमकी कोणाला देता, आम्ही चॅलेंज देतो एका दिवसासाठी विसरा तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि होऊन जाऊ दे एकदा… तुमच्या धमक्यांना आम्ही फाट्यावर मारतो., असं ट्विट करत निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

बेन स्टोक्स-संजू सॅमसनची मॅच विनिंग पार्टनरशिप; राजस्थानचा मुंबईवर एकतर्फी विजय

मराठा, ओबीसी, धनगर समाज सर्वांना न्याय देईन, मुख्यमंत्री म्हणून वचन- उद्धव ठाकरे

ऋतुराज गायकवाड-अंबाती रायडूची शानदार फलंदाजी; चेन्नईचा राॅयल चैलेंजर्स बेंगलोरवर 8 विकेट्सनी विजय

“मुख्यमंत्र्यांना बाहेर पडा म्हणणाऱ्या फडणवीसांना आता परिस्थिती किती गंभीर आहे, हे कळलं असेल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here