आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं कंबर जोरदार कसली असून पक्षाने आत्तापासूनच मोर्चेबांधणीला सूरूवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना-युवासेनेचे सरचिटणीस वरूण सरदेसाई हे संपूर्ण महाराष्ट्र दाैरा करत आहेत.
आज नागपुरात मेळाव्यासाठी आलेल्या वरुण सरदेसाईंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. यावेळी वरूण सरदेसाई यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मालमत्तेवर ईडीने कारवाई केलेल्या विषयावर भाष्य केलं.
हे ही वाचा : “शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण”
2019 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर संजय राऊत यांनी पुढाकार घेत महाविकास आघाडीची मोट बांधली. त्यांच्या प्रयत्नांनी भाजपचे 105 आमदार घरी बसले आणि सेनेचा मुख्यमंत्री बनवून दाखवला. हाच भाजपला राग आहे. हाच गुन्हा आहे का?, असं सरदेसाई म्हणाले.
दरम्यान, गेल्या दोन अडीच वर्षांपासून आपल्या कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी भाजपचे नेते सरकार पडण्याबाबत वक्तव्य करत आहेत. दर 15 दिवसांनी एक नवी तारीख देतात. पाच वर्षे नाही तर पुढील 25 वर्षे शिवसेना सत्तेत दिसेल आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहतील, असा दावा सरदेसाई यांनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
‘…म्हणून पूनम पांडेने ओलांडल्या सर्व मर्यादा’; कॅमेऱ्यासमोर झाली टॉपलेस
“मशिदीच्या भोंग्यावर कारवाई करायला सांगितले होते, ED ने थेट…”;मनसेचा संजय राऊतांना टोला