Home जळगाव उद्धव ठाकरेेंनी सत्तेतून बाहेर पडून, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे- रामदास आठवले

उद्धव ठाकरेेंनी सत्तेतून बाहेर पडून, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे- रामदास आठवले

545

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान पार पडलं. या निवडणूकीत भाजपनं महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे.

शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार यांचा पराभव झाला असून भाजपचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. यावरून केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा : “आगामी निवडणूकीच्या आधी मनसेकडून शिवसेनेला मोठे खिंडार, अनेक शिवसैनिकांनी केला मनसेत प्रवेश”

उद्धव ठाकरे यांनी सत्तेतून बाहेर पडावं आणि राजीनामा द्यावा, अशी मागणीच रामदास आठवलेंनी यावेळी केली. आठवले हे मुक्ताईनगर येथे प्रसिद्ध गायक स्वर्गीय प्रतापसिंग बोदडे यांच्या अभिवादन सभेसाठी आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

‘लोकशाहीमध्ये एका मताला फार मोठं महत्व असतं, एका मताने अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार हरलं होतं, नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत अपक्षांची मतं भाजपच्या पारड्यात पडलेली आहेत. यामुळे उद्धव ठाकरे यांना आता सत्तेवर राहण्याचा काही अधिकार नाही, त्यांनी आपल्यापदाचा राजीनामा दिला पाहिजे, सत्तेतून त्यांनी बाहेर पडले पाहिजे, अशी आमची त्यांना सूचना आहे, असं आठवले म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

2024 ला कोल्हापूरातून संजय पवार आमदार असतील फक्त शिवसेनेनं त्यांना…; तृप्ती देसाईंचं मोठं विधान

‘…या ठिकाणी झाली भाजप- मनसेची पहिली युती’; राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेल्या सोसायटीवर मिळविली सत्ता

आम्ही म्हणतोय ना तुम्हाला स्वयंघोषीत हिंदुजननायक मग…; दिपाली सय्यद यांचा मनसेला टोला