Home महाराष्ट्र उद्धव ठाकरेंनी, राज ठाकरेंकडे नेतृत्व दिलं पाहिजे, तरच…; या नेत्याचं मोठं विधान

उद्धव ठाकरेंनी, राज ठाकरेंकडे नेतृत्व दिलं पाहिजे, तरच…; या नेत्याचं मोठं विधान

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. ठाकरे गट-मनसे युती होणार, अशा चर्चा अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. यावर आता मनसे नेते प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठ्या भावाची भूमिका निभावत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे नेतृत्व दिलं पाहिजे. तरच, बाळासाहेबांचे विचार, स्वाभिमान, हिंदुत्व आणि मराठीपण टिकून राहिल, असं प्रकाश महाजन यांनी म्हटलं. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

ही बातमी पण वाचा : जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर? विजय वडेट्टीवर यांची प्रतिक्रिया,म्हणाले…

“चर्चा फक्त प्रसारमाध्यमांमध्ये आहे. प्रत्यक्ष भेटलेत का? राज ठाकरे घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल. पण, राज्यातील राजकीय परिस्थिती पक्ष पाहता, सक्षम विरोधी पक्ष किंवा नेता म्हणून राज ठाकरेंकडे पाहिलं जातं., असंही प्रकाश महाजन म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

“दादर हादरलं, धावत्या ट्रेनमधून तरूणीला खाली फेकलं, आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात”

“ठाकरे गट-मनसे युती होणार?; उद्धव ठाकरे, लवकरच राज ठाकरेंना फोन करणार?”

मोठी बातमी! शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीला अपघात