मला मारण्यासाठी उद्धव ठाकरेंनी छोटा राजनला सूपारी दिली होती; केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा गंभीर आरोप

0
218

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यात सध्या शिंदे आणि ठाकरे असे दोन गट आमनेसामने आले आहेत. मुंबईत शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दसरा मेळाव्याचं निमित्त साधत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. अशातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याच्या केलेल्या भाषणावर प्रतिक्रिया दिली आहे.

या सभेत काय वक्ते होते. तुम्ही कीती खाली गेलात हे दाखवून द्यायची गरजच उरली नाही. बाळासाहेब शिवसैनिकांना साभाळून घ्यायचे. मात्र उद्धव ठाकरे हे कपटी माणूस असून लबाड लांडगा आहे. शिवसेना सोडल्यावर मला मारण्याची सुपारी छोटा शकील, छोटा राजन टोळीला उद्धव ठाकरेंनी दिली होती, असा गंभीर आरोप नारायण राणेंनी यावेळी केला. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा : मोठी बातमी! IPL च्या ‘या’ खेळाडूला अटक; अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप

उद्धव ठाकरे हे अपघाताने मुख्यमंत्री झाले होते. त्यांनी इतक्या दिवस मराठी माणसासाठी काय केलं हे झालेल्या दसरा मेळाव्यात सांगायला हवं होत. मात्र सांगायला अस काहीच नाही. ‘शिवतीर्था’वर विरळ माणस उभे केले होती. ठाकरे भाषणाला उभे राहिल्यावर माणस बाहेर जात होते. यावरून त्यांनी आपली काय पात्रता ते समजून घ्यावं, अशी टीकाही राणेंनी यावेळी केली.

महत्त्वाच्या  घडामोडी –

संजूची सॅमसनची खेळी व्यर्थ; दक्षिण आफ्रिकेचा भारतावर 9 धावांनी विजय

‘या’ दिवशी शिंदे-ठाकरे येणार एकत्र?; मुहूर्त ठरला अन् ठिकाणही…

“भाजपचा काँग्रेसला दणका; ‘या’ 3 मोठ्या नेत्यांसह 200 कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here