मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आज 54 वा वाढदिवस; वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन

0
361

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज म्हणजे 14 जून रोजी वाढदिवस आहे. राज ठाकरेंचा हा 54 वा वाढदिवस आहे. मात्र तब्येत ठिक नसल्यानं राज ठाकरे आज कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम, उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

सध्या राज ठाकरे यांच्या पायाचं दुखणं वाढलं आहे. तसंच त्यांची हिप बोनची शस्त्रक्रिया ही होणार आहे. ही शस्त्रक्रिया पुढील आठवड्यात होणार आहे. यामुळे राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना भेटायला न येण्याचं आवाहन केलं आहे.

हे ही वाचा : …म्हणून फडणवीसांनी आपणांस विश्रांतीचा सल्ला दिलाय; अमोल मिटकरींचा सदाभाऊ खोतांना टोला

वाढदिवसाला कुणीही भेटायला येऊ नका, जिथे आहात तिथून शुभेच्छा द्या, 14 तारखेला भेटायला घरी येऊ नका. जिथे आहात तिथून शुभेच्छा द्या. कारण गेल्या अनेक दिवसांपासून माझी शस्त्रक्रिया पुढे ढकलते आहे. मध्यल्या काळात रुग्णालयात दाखल झालो पण कोरोनाचे डेड सेल्स सापडल्याने शस्त्रक्रिया रद्द झाली. आता ही शस्त्रक्रिया पुढील आठवड्यात पार पडणार आहे. आता पुन्हा तोच प्रकार नको म्हणून यावेळी वाढदिवशी कार्यकर्त्यांना भेटणार नाही. जिथून आहात तिथूनच शुभेच्छा द्या., असं आवाहन राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना केलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

काँग्रेसची मोठी खेळी; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यानं असंख्य समर्थकांसह केला काँग्रेसमध्ये प्रवेश

विधानपरिषद निवडणुकीपूर्वी प्रसाद लाड यांनी घेतली राज ठाकरेंची भेट; चर्चांना उधाण

अजित पवार यांनी पुन्हा आमच्यासोबत यावं; भाजपच्या ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here