आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : महात्मा गांधींचं पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असं सांगितलं जातं. परंतु, करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार त्यांचे खरे वडील होते, असं वादग्रस्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी काल बोलताना केलं होतं.
यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर आंदोलनं केली. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना,संभाजी भिडेंच्या वक्तव्याबद्दल निवेदन मांडलं. सभागृहात निवेदन सादर करत असताना देवेंद्र फडणवीसांनी काही वेळा संभाजी भिडेंचा उल्लेख भिडे गुरुजी केला. यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. यावरून आता परत फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं.
आम्हाला ते गुरुजी वाटतात. तुम्हाला काय अडचण आहे? त्यांचं नाव भिडे गुरुजी आहे, असं फडणवीस म्हणाले. यावरून आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाघव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ही बातमी पण वाचा : धक्कादायक ! सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या
भिडेंनी केलेल्या वक्तव्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन सादर केलं. या निवेदनात फडणवीस म्हणाले, अशाप्रकारे राष्ट्रपित्याचा कुणीही अपमान केलेलं आम्ही सहन करणार नाही. दुसऱ्या बाजुला ते म्हणाले, संभाजी भिडे हे आमचे गुरुजी आहेत. याचा अर्थ त्यांनी गुरुजींकडून शिक्षा घेतलीय. गुरुजींनी दिलेला धडा राजकर्ते म्हणून देवेंद्र फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे मान्यच केला आहे., असा टोला भास्कर जाधव यांनी यावेळी लगावला. ते सभागृहाच्या बाहेर माध्यमांशी बोलत होते.
संभाजी भिडे जर त्यांचे गुरुजी असतील तर याचा अर्थ देवेंद्र फडणवीसांनी मान्य केलं की, भिडेंना त्यांनीच बोलायला भाग पाडलं. ते आम्हाला मान्य आहे, असाच त्याचा अर्थ होतो., असाही टोमणा भास्कर जाधव यांनी यावेळी लगावला.
महत्त्वाच्या घडामोडी –
“मराठीमध्ये व्हिडिओ रिल्स बनविणाऱ्यांना, राज ठाकरेंनी दिली ‘ही’ जबाबदारी”