आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे 40 आमदारांना घेऊन शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्यासह 8 आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे.
अशातच उद्या अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून बैठक बोलावण्यात आली आहे. अजित पवार गटाने मुंबईतील भुजबळ नॉलेज सिटी येथे बैठकीचं आयोजन केलं आहे. तर शरद पवार गटाकडून मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे बैठकीचं आयोजन केलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार व अजित पवार एकत्र येण्यास अजूनही संधी आहे, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी यावेळी दिली. ते टी.व्ही. 9 मराठीशी बोलत होते.
ही बातमी पण वाचा : “मी, शरद पवार साहेबांसोबतच; अजित पवारांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असणाऱ्या ‘या’ आमदाराचा निर्णय”
आमच्याकडे 40 पेक्षा अधिक आमदार आहेत, असा दावा अजित पवार गटाने केला आहे. तुम्ही आमदारांशी संपर्क केला आहे का? असा प्रश्न विचारला असता रोहित पवार यांनी, “सर्वच आमदार शरद पवारांना फोन करत आहेत. जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे हेही सर्व आमदारांच्या संपर्कात आहेत. तसेच अजित पवार आणि त्यांचे नेतेही आमदारांच्या संपर्कात आहेत. पण आज कोण-कुठे आहे? हे सांगता येणार नाही.”, असं उत्तर दिलं.
दरम्यान, अजित पवार व शरद पवारांनी एकत्र राहिलं पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. यावर तुमचं मत काय? असं विचारलं असता रोहित पवार यांनी, माझंही मत असंच आहे की, अजित पवारांनी शरद पवारांबरोबर राहायला हवं होतं. दोघं एकत्र येण्याची अजूनही संधी आहे. पण पुढे बघू काय होतंय ते. शेवटी जे काही होणार आहे, ते होणारच आहे. ते झाल्यानंतर शरद पवार जो निर्णय घेतील, तो निर्णय आम्हाला स्वीकारावा लागेल.”, असं स्पष्टीकरण रोहित पवारांनी यावेळी दिलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र आलं पाहिजे, पण…; सुषमा अंधारेंचं मोठं विधान
“एकनाथ शिंदेच्या बंडावेळी राष्ट्रवादी, भाजपसोबत सत्ता स्थापन करणार होती”