आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे 40 आमदारांना घेऊन शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्यासह आठ आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. या सगळ्या घडामोडींवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ज्यांची नावं आली आहेत त्यातल्या काही लोकांनी माझ्याशी संपर्क साधून आम्हाला निमंत्रित करुन सह्या घेतल्या पण आमची भूमिका वेगळी आहे याचा खुलासा त्यांनी माझ्याकडे केला आहे. याबाबतीत मी आत्ताच काही बोलणार नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
ही बातमी पण वाचा : अजित पवारांच्या बंडावर आता काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….
मला जे सांगत आहेत त्यांनी जनतेसमोर हे मांडलं तर मी ते मान्य करेन अन्यथा त्यांनीही वेगळी भूमिका घेतली असं मी समजेन, असंही शरद पवार म्हणाले आहेत.
आजचा प्रकार हा इतरांना नवीन असेल. मला हा नवीन नाही. १९८० मध्ये निवडणुकीच्या नंतर मी ज्या पक्षाचं नेतृत्व करत होतो त्याचे ५८ आमदार निवडून आले होते. एक महिन्यानंतर सहा सोडले तर बाकी सगळे सोडून गेले होते. सगळे पक्ष सोडून गेले, मी विरोधी पक्षनेता होता. त्यावेळी मी पाच लोकांचा नेता झालो. पाच लोकांना बरोबर घेऊन मी महाराष्ट्रात बाहेर पडलो. पुन्हा पक्षाची बांधणी केली. त्यानंतर जी निवडणूक झाली की त्यात आमची संख्या ६९ वर गेली ही दिसलं, असंही शरद पवार यांनी सांगितलं.
दरम्यान, त्यावेळी जे पक्ष सोडून गेले त्यापैकी ४ जण सोडले तर बाकी सगळे पराभूत झाले. १९८० ला जे चित्र दिसलं तेच जनतेच्या पाठिंब्यावर कसं उभं करता येईल हे मी पाहतो आहे. माझा महाराष्ट्राच्या जनतेवर प्रचंड विश्वास आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
अजितदादा यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, मी शुक्रवारीच….
अजित पवारांच्या शपथविधीवर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….
शरद पवार यांची सर्वात पहिली प्रतिक्रिया; म्हणाले….