Home भाजप … हा तर मानसिक विकलांगतेचा तमाशा; अर्णब प्रकरणावरून शिवसेनेची भाजपवर टीका

… हा तर मानसिक विकलांगतेचा तमाशा; अर्णब प्रकरणावरून शिवसेनेची भाजपवर टीका

175

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर राज्यातील विरोधी खुर्चीत बसलेले भाजपचे नेते सातत्याने राज्य सरकारवर टीका करत आहेत, राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं करत आहेत. यावरुन शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून विरोधकांना निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रात 2018 साली एका माय-लेकरांनी आत्महत्या केली. तत्कालीन सरकारने ते प्रकरण दडपले. पोलिसांनी या प्रकरणातील एका आरोपीस पकडले व त्याच्या जामिनावर न्यायालयात सुनावणी सुरू असताना भाजपाचे पुढारी वेडेखुळेच बनले. ते म्हणतात, जोपर्यंत सदोष मनुष्यवधातले ‘महात्मा’ सुटत नाहीत तोपर्यंत आम्ही सगळे दंडास काळ्या फिती लावून काम करू. हा तर मानसिक विकलांगतेचा तमाशाच आहे, असं म्हणत शिवसेनेने भाजपवर टीका केला आहे.

नशीब की, याप्रश्नी भाजपाने राज्यव्यापी जेल भरो, साखळी उपोषणे यांसारखे प्रयोग सुरू केलेले नाहीत. मनाने भरकटलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प अमेरिकेत जसे वागत आहेत तसेच ‘डिट्टो’ महाराष्ट्रातील भाजपा पुढारी वागू लागले आहेत, असंही शिवसेनेनं सामनामधून म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

बेंगलोरचं विजेतेपदाचं स्वप्न पुन्हा भंगलं; रंगतदार सामन्यात हैदराबादचा 6 गडी राखून विजयी

सरकारनं पुढे येऊन चर्चा करावी, मी मदत करण्यास तयार- नितेश राणे

आदित्य ठाकरे आपण लपूनछपून उत्तर देण्यापेक्षा थेट चर्चेला या- आशिष शेलार

फडणवीस सरकारने मुंबईकरांचा विश्वासघात केला हे सिद्ध करुन दाखवणार- सचिन सावंत