Home क्रीडा बेंगलोरचं विजेतेपदाचं स्वप्न पुन्हा भंगलं; रंगतदार सामन्यात हैदराबादचा 6 गडी राखून विजयी

बेंगलोरचं विजेतेपदाचं स्वप्न पुन्हा भंगलं; रंगतदार सामन्यात हैदराबादचा 6 गडी राखून विजयी

दुबई : राॅयल चैलेंजर्स बेंगलोर विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात सनराईझर्स हैदराबादने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर 6 गडी राखून मात केली. या पराभवासह राॅयल चैलेंजर्स बेंगलोरचं स्पर्धेतलं आव्हानही संपुष्टात आलं आहे.

राॅयल चैलेंजर्स बेंगलोरने प्रथम फलंदानजी करत  हैदराबादला विजयासाठी 132 धावांचं लक्ष दिलं विल्यमसन-होल्डरने संयमी फलंदाजी करत हे आव्हान पूर्ण केलं. विल्यमसनने नाबाद अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

विल्यमसनने नाबाद 50धावा केल्या. त्याला होल्डरने 24 धावा करत मोलाची साथ दिली. कप बंगळुरुकडून मोहम्मद सिराजने 2 तर झॅम्पा आणि चहलने प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

दरम्यान, या पराभवासोबत राॅयल चैलेंजर्स बेंगलोरच्या संघाचं विजेतेपदाचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

सरकारनं पुढे येऊन चर्चा करावी, मी मदत करण्यास तयार- नितेश राणे

आदित्य ठाकरे आपण लपूनछपून उत्तर देण्यापेक्षा थेट चर्चेला या- आशिष शेलार

फडणवीस सरकारने मुंबईकरांचा विश्वासघात केला हे सिद्ध करुन दाखवणार- सचिन सावंत

एलिमिनेटर! सनरायझर्स हैदराबादने टाॅस जिंकला; प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय