विरोधी पक्षांनी रोज उठून बोटं मोडली म्हणून हे सरकार बदलत नाही- पृथ्वीराज चव्हाण

0
223

मुंबई : विरोधी पक्षांनी रोज उठून बोटं मोडली म्हणून हे सरकार बदलत नाही., असं म्हणत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप आणि विरोधकांवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी राज्यात परिस्थिती नाहीये. कारण सरकारने या वर्षभरात चांगलं काम केलं आहे. विरोधक केवळ द्वेषातून आरोप करत असून हे आरोप कोणीही गांभीर्याने घेत नाही., असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीचं सरकार हे भक्कम आणि चांगलं चालणारं सरकार आहे. तसंच चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस यामध्ये चाललेली जुगलबंदी ही केवळ एक करमणूक आहे. यापेक्षा त्याला अधिक महत्त्व नाही., असंही चव्हाण म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“विराट कोहलीशी तुलना होणाऱ्या पाकिस्तानच्या बाबर आझमवर लैंगिक छळाचे आरोप”

संजय राऊत यांच्या नातेवाईकांना ईडीच्या नोटीसा- नितेश राणे

अमृता फडणवीस यांच्यावर होणाऱ्या टीकेबाबत देवेंद्र फडणवीसांनी सोडलं माैन; म्हणाले…

“शरद पवारांना नोटीस आली अन् चित्रं बदललं, आता शिवसेनेलाही नोटीस आलीय, ईडीचा पायगुण चांगला, येऊ द्या नोटीसा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here