आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे.
वाढती बेरोजगारी, महागाई, सातत्याने कमी होत चाललेलं उत्पन्न यामुळे सर्वसामान्यांच्या मनात प्रचंड अस्वस्थता आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे सुक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासमोर मोठी आव्हाने उभी राहिली आहेत, लोकांची क्रय शक्ती कमी होत असताना खासगी क्षेत्रातील गुंतवणूक कमी होत आहे., अशी टीका उद्धव ठाकरेंनी यावेळी केली.
हे ही वाचा : मुंबईतील निर्बंधांमध्ये शिथीलता; ‘असे’ असतील आजपासूनचे नवीन नियम
अशा परिस्थितीत केंद्रीय अर्थसंकल्पातून ठोस उत्तरे मिळतील अशी अपेक्षा होती. परंतु लोकमनातील अस्वस्थता केंद्र सरकारपर्यंत पोहोचलेली दिसत नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प नोकरदारांसह सर्वसामान्यांच्या अपेक्षांचा भंग करतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे.
अशा परिस्थितीत केंद्रीय अर्थसंकल्पातून ठोस उत्तरे मिळतील अशी अपेक्षा होती. परंतु लोकमनातील अस्वस्थता केंद्र सरकारपर्यंत पोहोचलेली दिसत नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प नोकरदारांसह सर्वसामान्यांच्या अपेक्षांचा भंग करतो अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 1, 2022
महत्वाच्या घडामोडी –
पुण्यातील भाजपचे 16 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार; ‘या’ नेत्याचा धक्कादायक दावा
Budget 2022 : काय स्वस्त होणार, काय महाग होणार? वाचा सविस्तर
आता नारायण राणेंना देशातला कायदा माहिती पडला असेल; नितेश राणेंचा जामीनीवरुन शिवसेनेची टीका