Home महाराष्ट्र BUDGET 2022 : हा अर्थसंकल्प कमी आणि जाहीरनामा जास्त वाटतोय; आदित्य ठाकरेंची...

BUDGET 2022 : हा अर्थसंकल्प कमी आणि जाहीरनामा जास्त वाटतोय; आदित्य ठाकरेंची टीका

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पावर  राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी  टीका केली आहे.

हा अर्थसंकल्प कमी आणि जाहीरनामा जास्त वाटतोय, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा : ‘…मात्र आम्ही तत्वं विकून दुसऱ्या सोबत गेलो नाही’; मनसेची शिवसेनेवर टीका

अर्थसंकल्पात आकड्यांऐवजी मोठ मोठी तत्वज्ञान आणि संकल्पना दिसल्या. सीतारमण म्हणाल्या की, इंटरोपरेबिलिटी होणार इंटरोपरेबिलिटी होणार किंवा मोठ्या शहरांमध्ये अजून काही स्मार्ट सिटी होणार. काही गोष्टी केल्या तर कुठे टाईम लाईन किंवा तारीख दिलेलीली नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत

दरम्यान, महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वाढलेल्या अर्थसंकल्पात राज्याला किती निधी मिळणार आहे का हाच मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्र सर्वाधिक जीएसटी भरणार राज्य आहे परंतु आता घोषणा झाल्या अंमलबजावणी केव्हा करणार हे पाहणं महत्त्वाचे राहील, असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर न्यायालयाबाहेरच निलेश राणेंची पोलिसांशी बाचाबाची

“मनसेत सुसाट इनकमिंग; जालन्यात विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी केला मनसेत प्रवेश”

छगन भुजबळांकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं खास स्वागत; राजकीय चर्चांना उधाण