आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : उद्धव ठाकरे यांना राज्यातील जनता मुख्यमंत्री मानायला तयार नाही, असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.भाजपच्या कार्यकारिणीला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं.
सध्या महाराष्ट्रावर विश्वासहार्यतेचं संकट उभं राहिलं आहे. देशातील सर्वाधिक प्रगतीशील, सर्वाधिक समृद्ध आणि सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेलं राज्य आहे. पण या राज्यात सरकार कुठे आहे? हे विचारण्याची वेळ आली आहे. सरकारचं अस्तित्वच दिसत नाहीये. एक मुख्यमंत्री आहेत. त्यांना कोणी मुख्यमंत्री मानायला तयार नाहीये. प्रत्येक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री मानतो. पण आपल्या स्वतच्या पलिकडे पाहायला तयार नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केली.
हे ही वाचा : उद्धव ठाकरे आमच्या सोबत राहिले असते तर…; रामदास आठवलेंचं मोठं विधान
राज्यातील जनता रोज होरपळते आहे. पण त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणीही तयार नाही. कोणी राज्य म्हणून विचार करत नाही. कोणी जनतेचा विचार करत नाही. कोणी समस्यांचा विचार करत नाही. खरं म्हणजे पाच वर्ष आपलं सरकार होतं. आपल्या सरकारच्या काळात समृद्धी महामार्ग, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, डिजीटल इंडिया, सर्वांना घरे देणं… या मुद्द्यांवर आपण चर्चा करायचो. पण आज परिस्थिती काय? तर आज या सरकारमध्ये गांजावर चर्चा होते. हर्बल तंबाखू, वसुली, स्थगिती, बदली, खंडणी यावर चर्चा होते. पण शेतकरी आणि गोरगरिबांवर चर्चा होत नाही. या सरकारच्या काळात हजारो कोटीची लूट सुरू आहे. वाटमारी सुरू आहे. पण सामान्य लोकांकडे पाहायला कुणालाही वेळ नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
दरम्यान, भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रकृती बरी होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या.
महत्वाच्या घडामोडी –
राष्ट्रवादीच्या सहकार पॅनेललाच सर्वाधिक मते मिळणार- शिवेंद्रराजे भोसले