आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
जळगाव : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जळगावमध्ये माध्यमांशी बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
शरद पवारांनी 1978 साली वसंतदादा पाटील यांच्या सरकारमधून 40 आमदार फोडून भाजपबरोबर सरकार स्थापन केलं होतं. तेच लोक आता एकनाथ शिंदे यांना बेईमान म्हणत आहेत, असा टोला फडणवीसांनी यावेळी लगावला. ते जळगाव येथे ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात बोलत होते.
ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! रोहिणी खडसेंना जळगाव पोलिसांनी घेतलं ताब्यात, एकनाथ खडसेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले…
मला कधी कधी आश्चर्य वाटतं की, काही लोक आमच्या सरकारला नावं ठेवतात. काल-परवा राष्ट्रवादीचे लोक म्हणाले की, आम्ही बेईमानीने सरकार स्थापन केलं. त्यामुळे मी त्यांना आठवण करून दिली की, 1978 साली शरद पवार हे वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये मंत्री होते. ते सरकारमधील 40 आमदार घेऊन बाहेर पडले आणि मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांनी बेईमानी केली, असं कुणीही म्हटलं नाही.
पवारांनी, तेंव्हाच्या भाजपबरोबर सरकार स्थापन केलं होतं. त्यांना कुणीही बेईमान म्हटलं नाही. त्याला पवारसाहेबांची मुत्सद्देगिरी म्हटलं. मग आमच्या एकनाथ शिंदे यांनी तर भाजपाबरोबर निवडणूक लढवली होती. पण जेंव्हा उद्धव ठाकरे खुर्चीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले. तेव्हा विचार आणि विकासाठी एकनाथ शिंदेंनी भूमिका घेतली. शरद पवारांप्रमाणे तेही 50 आमदारांना घेऊन बाहेर पडले आणि सरकार स्थापन केलं. मग शरद पवारांचं वागणं मुत्सद्देगिरी असेल तर एकनाथ शिंदेंचं वागणंही मुत्सद्देगिरीच आहे., असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, याउलट एकनाथ शिंदे तर भाजपबरोबर निवडून आले होते आणि त्यांनी भाजपबरोबरच सरकार स्थापन केलं. त्यामुळे जे लोक त्यांना बेईमान म्हणतात, त्यांच्यापेक्षा मोठे बेईमान आणि त्यांच्यापेक्षा मोठे गद्दार महाराष्ट्रात दुसरं कुणीही नाही. अशा गद्दारांना पुढच्या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता जागा दाखवून देईल, अशी टीका फडणवीसांनी यावेळी केली.
महत्त्वाच्या घडामोडी –
“केसीआर यांचा झाला मोठा राजकीय गेम, महाराष्ट्रात दिमाखदार एंट्री, मात्र तेलंगनामध्ये मोठा उलटफेर”
आम्ही भाजपसोबत आहोत, मात्र…; महादेव जानकर यांचा भाजपला गंभीर इशारा
विरोधी पक्षनेतेपद का नकोय?; अखेर अजित पवारांनी सांगितलं नेमकं कारण, म्हणाले, अरे बाबा…