आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : पाटण्यातील विरोधकांची बैठक झाल्यानंतर देशातील राजकीय वातावरण तापल्याचं दिसून येत आहे.
पाटण्यातील बैठकीनंतर पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला होता. शरद पवारांच्या मुलीचं भलं करायचं असेल तर राष्ट्रवादीला मत द्या, अशी टीका मोदींनी शरद पवारांवर केली होती. यावरून आता शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ही बातमी पण वाचा : “वर्ल्ड कप आधीच टीम इंडियाला मोठा धक्का, ‘हा’ स्टार खेळाडू वर्ल्ड कपमधून बाहेर?”
महिलांना आरक्षण देण्यासंबंधीचा निर्णय मोदींनी घ्यावा, असं आवाहन शरद पवार यांनी यावेळी केलं. तसेच यावेळी आपण राज्यात महिलांना आरक्षण दिल्याची आठवण त्यांनी करुन दिली. आता विधीमंडळ आणि संसद या दोन ठिकाणी स्त्रियांना आरक्षण द्यायची भूमिका घ्यायला हवी, जर मोदीसाहेब भूमिका घेत असतील तर आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देऊ, असं थेट आव्हान शरद पवारांनी यावेळी मोदींना यावेळी दिलं. तसेच पंतप्रधान मोदी यांच्याशी वैयक्तिक काही नाही. आत्ताच टिळक पुरस्कारासाठी बोललो ते येतो म्हटलो, अशीही माहितीही शरद पवारांनी यावेळी दिली.
महत्त्वाच्या घडामोडी –
अनेक राज्यांमध्ये भाजपचं…; शरद पवार यांची भाजपवर टीका
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले…त्यामुळे फडणवीस…