Home महाराष्ट्र “…तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील”; बाळा नांदगावकर यांचं मोठं विधान

“…तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील”; बाळा नांदगावकर यांचं मोठं विधान

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं ‘भावी मुख्यमंत्र्यां’चे बॅनर्स झळकत आहेत. यावरून राज्यात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अशातच मनसेचे नेते बाळा नांदगावर यांनीही एक मोठं वक्तव्य केलं आहे.

आमच्या पक्षाला सत्ता दिली, तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील, असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे. ‘महाराष्ट्र दिन’ आणि ‘कामगार दिना’निमित्त मनसेच्या वतीने कामगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते.

ही बातमी पण वाचा : अडीच वर्षात दमडी सुद्धा या ठाकरे सरकारने फेकून मारलेली नव्हती; भाजप नेत्याची टीका

“मध्यावधीची कोणतीही शक्यता वाटत नाही. बॅनरबाजी करणं हा ज्यांच्या त्यांच्या पक्षांचा विचार आहे. त्यावर भाष्य करणं योग्य नाही. पण, आमच्या पक्षाला सत्ता दिली, तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील”, असं बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी –

आता तरी, लोकांना खात्री पटली की, राष्ट्रवादीनंच शिवसेना संपवली; शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचा दावा

…यासाठी उद्धव ठाकरेंनी 5 कोटी घेतले; नारायण राणेंचा मोठा आरोप

एकनाथ खडसेंचा भाजपला धक्का; बोदवडचा गड राखला