नांदेड : ओबीसी आरक्षणावरून भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता.
ओबीसींच्या आरक्षण प्रश्नासाठी मंत्रिपदाला लाथ मारण्याचा दम महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळातील एकातरी मंत्र्यात आहे का?, असं म्हणत प्रीतम मुंडे यांनी धनंजय मुंडेंना अप्रत्यक्ष टोला लगावला होता. यावर धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते नांदेडमध्ये माध्यमांशी बोलत होते.
केंद्रात भाजपचं सरकार आहे. प्रीतम मुंडे या सत्ताधारी पक्षाच्या खासदार आहेत. त्यांनी ओबीसी आरक्षण केंद्र सरकारकडून टिकवावं, असा सल्ला धनंजय मुंडे यांनी यावेळी दिला. तसंच प्रीतम मुंडे यांनी तसं केलं तर खऱ्या अर्थाने स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा वारसा त्या चालवत आहात हे सिद्ध होईल, असं प्रत्युत्तर धनंजय मुंडेंनी प्रीतम मुंडेंना यावेळी दिलं.
महत्वाच्या घडामोडी –
“ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण होणे हे भाजपाचे पाप
राजकारणात पंतप्रधान मोदी किंवा फडणवीसांवर देखील एखादा अधिकारी आरोप करू शकतो- जयंत पाटील
“महाराष्ट्र कितीही संकटात अडकला तरी चालेल, पण ठाकरे सरकारची वसुली कमी पडता कामा नये”
“गोपीचंद पडळकर हे बांडगुळ आहेत आणि अशी बांडगुळं वाढत आहेत”