Home महाराष्ट्र “ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण होणे हे भाजपाचे पाप “

“ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण होणे हे भाजपाचे पाप “

मुंबई : सध्या राज्यात मराठा आरक्षणापाठोपाठ ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपाने आक्रमक भूमिका घेत, काल राज्यभरात चक्काजाम आंदोलन केलं. यावरुन काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपावर निशाणा साधलाय.

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण होणे हे भाजपाचे पाप आहे. अनेकदा आश्वासन देऊन फसवणूक करणाऱ्या फडणवीसांच्या बोलण्यावर जनतेचा विश्वास बसणार नाही, असं सचिन सावंत म्हणाले आहेत.

दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी नीती आयोगाच्या अध्यक्षांना आणि  पंकजा मुंडेंनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहून ओबीसींच्या जनगणनेची माहिती मागितली होती. दोन वर्षं भाजपा नेत्यांनी मागणी करुनही केंद्र सरकार ती देत नसेल तर त्यात महा विकास आघाडी सरकारची चूक काय?, असा सवालही सचिन सांवत यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

राजकारणात पंतप्रधान मोदी किंवा फडणवीसांवर देखील एखादा अधिकारी आरोप करू शकतो- जयंत पाटील

“महाराष्ट्र कितीही संकटात अडकला तरी चालेल, पण ठाकरे सरकारची वसुली कमी पडता कामा नये”

“गोपीचंद पडळकर हे बांडगुळ आहेत आणि अशी बांडगुळं वाढत आहेत”

“सत्ता नसेल तर महाराष्ट्रासाठी काहीच देणार नाही, हा फडणवीसांचा दुटप्पीपणा”