Home महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्राला गरज, त्यांचं भविष्य उज्वल, मी स्वत: भेटेन- संजय राऊत

देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्राला गरज, त्यांचं भविष्य उज्वल, मी स्वत: भेटेन- संजय राऊत

मुंबई : भाजपने 26 जून रोजी ओबीसी आरक्षण पूर्ववत करावं यासाठी चक्का जाम आंदोलन केलं होतं. नागपुरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडलं. यावेळी बोलताना त्यांनी, “आमच्या हातात पुन्हा सूत्रं दिली तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन, नाहीतर मी राजकारणातून संन्यास घेईन,” असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

देवेंद्र फडणवीस हे लढवय्ये नेते आहेत. त्यांचं राजकीय भविष्य उज्ज्वल आहे. त्यांना संन्यासाची भाषा शोभत नाही. ते फकीर होण्याची भाषा करत असतील तर मी स्वत: त्यांची भेट घेईन, असं संजय राऊत यांनी म्हटलं. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, देवेंद्रजींना संन्यास घेऊ देणार नाही, त्यांची महाराष्ट्र, देशाला गरज आहे. त्यांची वीरक्तीची भाषा हा महाराष्ट्रावर अन्याय होईल. चांगल्या नेतृत्त्वाचा राजकारणात तुटवडा आहे. देवेंद्र फडणवीसांसारख्या हरहुन्नरी नेत्यांना फकीर होण्याची भाषा योग्य नाही, असं मत संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केलं.

महत्वाच्या घडामोडी –

“…तर आपण खऱ्या अर्थाने गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत आहात हे सिद्ध होईल”

“ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण होणे हे भाजपाचे पाप 

राजकारणात पंतप्रधान मोदी किंवा फडणवीसांवर देखील एखादा अधिकारी आरोप करू शकतो- जयंत पाटील

“महाराष्ट्र कितीही संकटात अडकला तरी चालेल, पण ठाकरे सरकारची वसुली कमी पडता कामा नये”