…तर मी शिवसेना सोडून, काँग्रेसमध्ये काम करेन; ‘या’ आमदाराचं थेट राहुल गांधींना आवाहन

0
189

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

ठाणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूरवी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला होता.  त्यानंतर भाजप आणि शिवसेना हे राहुल गांधींविरोधात आक्रमक झाली असून राहुल गांधींविरोधात भाजप आणि शिवसेनेकडून निषेध केला जात आहेत.

राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप-शिवसेनेकडून सावरकर गौरव यात्रा सूरू करण्यात येत आहे. याबाबतची माहिती शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच यावेळी बोलताना भोईर यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.

ही बातमी पण वाचा : माझ्या संयमाचा अंत बघू नका, मी जर तोंड उघडलं तर…; फडणवीसांचा, ठाकरेंना इशारा

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. कोलू चालवला, मरण यातना भोगल्या. त्यामुळे माझी एकच मागणी आहे की, राहुल गांधी यांना एक दिवस कोलूला जुपा, मी शिवसेना सोडून देईल आणि राहुल गांधीच्या मागे येईल. तसेच काँग्रेसचे काम करणार, असं आवाहन आमदार भोईर यांनी यावेळी केलं.

महत्त्वाच्या घडामोडी 

“ठाकरेंना मोठा धक्का; ठाण्यात मारहाण करण्यात आलेल्या ‘त्या’ महिलेवरच…”

मुख्यमंत्री म्हणायचे की गुंड मंत्री? आता नवीन ‘गुंड’ खाते तयार करा; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

संजय शिरसाट म्हणाले लोकसभेपूर्वीच अशोक चव्हाण भाजपात जातील; आता अशोक चव्हाण म्हणतात….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here