Home महाराष्ट्र संजय शिरसाट म्हणाले लोकसभेपूर्वीच अशोक चव्हाण भाजपात जातील; आता अशोक चव्हाण म्हणतात….

संजय शिरसाट म्हणाले लोकसभेपूर्वीच अशोक चव्हाण भाजपात जातील; आता अशोक चव्हाण म्हणतात….

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी आगामी लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण भाजपात जातील, असा मोठा दावा केला होता. त्यावर अशोक चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

संजय शिरसाट यांच्या कोणत्याही वक्तव्याची दखल घ्यायला हवी, असं मला वाटत नाही. येत्या काळात संजय शिरसाट यांनाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेल्याशिवाय पर्याय नाही, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. ते नांदेड येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

ही बातमी पण वाचा : मराठमोळ्या ऋुतुराज-तुषारपुढे लखनाै हतबल, रोमहर्षक सामन्यात चेन्नईचा लखनाैवर 12 धावांनी विजय

संजय शिरसाट हे भविष्यकार आहेत का? शिरसाटांच्या कुठल्याही वक्तव्याची फार दखल घ्यायला हवी, असं मला वाटत नाही. दुसरा मुद्दा असा की, त्यांना मंत्रिमंडळात घेतलं जात नाही, हे निश्चितच झालं आहे. या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होतच नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही, त्यामुळे त्यांच्याकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेल्याशिवाय पर्याय नाही. ते लवकरच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जातील, असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी 

“मविआला मोठा धक्का, कालच्या सभेनंतर राष्ट्रवादीच्या अनेक नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश”

“मोठी बातमी! लोकसभेपूर्वीच काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप?; अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार?”

भाजपचा उध्दव ठाकरेंना मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश