Home महाराष्ट्र घरात बसलेले तीनचाकी सरकार लोकल संघर्षापुढे नमले; केशव उपाध्येंची ठाकरे सरकारवर ...

घरात बसलेले तीनचाकी सरकार लोकल संघर्षापुढे नमले; केशव उपाध्येंची ठाकरे सरकारवर टीका

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोना लसीचे दोन घेणाऱ्या नागरिकांना 15 ऑगस्टपासून लोकलने प्रवास करण्याची मंजुरी दिली आहे. यावरुन भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

सविनय कायदेभंगाच्या लढ्यानंतर 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाला. सविनय नियमभंगाच्या लढ्यामुळे 15 ऑगस्ट 2021 ला मुंबईकर स्वतंत्र झाला. घरात बसलेले तीनचाकी सरकार लोकल संघर्षापुढे नमले. अभिनंदन मुंबईकर!”, असे केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

“भाजपाच्या आंदोलनानंतर अखेरीस मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांना लोकल प्रवासाची बुद्धी झाली. पण दोन डोस झालेल्यांसाठी वेगळी परवानगी काढायची अट कशाला ठेवलीत? एरवी उठसूठ केंद्राकडे बोट दाखवता पण लशीच्या डोसाच्या नोंदणीसाठी केंद्र सरकारनेच तयार केलेल्या आरोग्य सेतू ॲपचा वापर का करत नाही?, असंही केशव उपाध्ये म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

कोरोना लसीचे 2 डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करण्याची मुभा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्रातील भाजपचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पण ऐकत नाहीत- नवाब मलिक

“पावसामुळे पाचव्या दिवसाचा खेळ रद्द; भारत विरूद्ध इंग्लंड कसोटी सामना अनिर्णीत”

“मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो; उद्धव ठाकरेंकडून नीरज चोप्राच्या कुटुंबीयांना फोन