“महाराष्ट्रात जो चमत्कार झाला, तोच चमत्कार 2024 ला दिल्लीत होणार”

0
471

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्ताने मुंबईत व्हर्च्युअल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीला संबोधित करताना राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एक विधान करून राजकीय चर्चांना उधाण आणलं आहे.

हे ही वाचा : “मोठी बातमी! संजय राऊत यांच्याविरोधात दिल्लीत गुन्हा, भाजप कार्यकर्त्यांविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप”

शरद पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात जो चमत्कार झाला. तोच चमत्कार 2024मध्ये दिल्लीत होईल, असा दावा छगन भुजबळांनी यावेळी केला. भुजबळांच्या या विधानाने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

संपूर्ण देशभरात सर्वांना सोबत घेऊन जाण्याची ताकद शरद पवार यांच्यात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात जो महाविकास आघाडी सरकारचा चमत्कार झाला. तसाच चमत्कार 2024मध्ये दिल्लीत होईल. त्यासाठी पवारांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असं आवाहन भुजबळांनी यावेळी केलं.

महत्वाच्या घडामोडी –

…हे आमच्या मुंडे साहेबांचे संस्कार नाहीत; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

‘मला भावलेले पवार साहेब’ असं कॅप्शन देत अमोल कोल्हेंनी शेअर केला व्हिडीओ

‘मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराची गटारगंगा वाहते’; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here