Home महत्वाच्या बातम्या “कोकणच्या जनतेनं ठाकरे गटाला लाथाडलं”; शिंदे गटाचा टोला

“कोकणच्या जनतेनं ठाकरे गटाला लाथाडलं”; शिंदे गटाचा टोला

168

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीनंतर जाहीर झालेल्या निकालानंतर राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी आता एकमेकांवर जोरदार टीका करण्यास सुरूवात केली आहे.

एकीकडे नागपूर विभागात महाविकास आघाडीने आपला उमेदवार निवडून आणला आहे. त्यामुळे भाजपच्या बालेकिल्ल्यात जाऊन महाविकास आघाडीने विजय मिळवल्यानंतर महविकास आघाडीने भाजपवर निशाणा साधला, तर दुसरीकडे कोकण हा ठाकरे गटाचा बालेकिल्ला समजला जातो त्या विभागात भाजप आणि शिंदे गटाच्या उमेदवाराने विजय मिळवला यावरून शिंदे गटाने ठाकरे गटाला डिवाचलं आहे.

हे ही वाचा :  “पंढरपूरमध्ये ठाकरेंचा राजू शेट्टींना धक्का; ‘हा’ आक्रमक नेता शिवबंधन हाती बांधणार

शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी या निकालावरून कोकण शिक्षक मतदारसंघांमध्ये जो आम्हाला विजय मिळाला आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे अशी टीका त्यांनी केली आहे.

आतापर्यंत ठाकरे गट म्हणत होते की कोकण आमचा बालेकिल्ला आहे. मात्र आता तो कोकणच्या शिक्षक मतदारांनी दाखवून हा बालेकिल्ला कोणाचा आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेनाचा युतीच्या बाजूनी आहोत बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा बाजूनी आहोत. त्यामुळे आम्हाला विजयी केले आहे तर कोकणच्या जनतेने बाळासाहेब ठाकरे गटाला लथाडले, असं नरेश म्हस्के म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी –

 “नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट; सत्यजित तांबेंचा शुभांगी पाटलांना धक्का, तांबे तब्बल ‘इतक्या’ मतांनी आघाडीवर”

“फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीची बाजी, नागपूरातून सुधाकर आडबाले विजयी”

“अभिनयानंतर आता राजकारणात एंट्री; ‘या’ मराठमोठ्या अभिनेत्यानं हाती बांधलं घड्याळ”