Home महाराष्ट्र खड्ड्यात गेलेल्या पक्षानं आम्हांला खड्ड्यात घालण्याची भाषा करू नये; शिवसेनेचा पलटवार

खड्ड्यात गेलेल्या पक्षानं आम्हांला खड्ड्यात घालण्याची भाषा करू नये; शिवसेनेचा पलटवार

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कल्याण : कल्याणमधील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य झाल्याने मनसे आक्रमक झाली आहे. मनसे नेते राजू पाटील हे प्रचंड संतप्त झाले असून त्यांनी यावेळी प्रशासनाला इशारा दिला. कल्याणमधील खड्डे तातडीने भरा नाही तर आम्हालाच तुम्हाला खड्ड्यता भरावे लागेल, असा संतप्त इशारा राजू पाटील यांनी यावेळी दिला. यावरून शिवसेनेचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी जोरदार पलटवार केला आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या 2010 सालच्या निवडणूकीत मनसेचे 29 नगरसेवक निवडून आले होते. 2015मध्ये मनसेचे 9 नगरसेवक निवडून आले होते. त्यांची संख्या कमी होत गेली. त्यामुळे मनसे हाच खड्ड्यात गेलेला पक्ष आहे. त्याने कोणाला खड्ड्यात घालण्याची भाषा करु नये, असं जोरदार प्रत्युत्तर दीपेेश म्हात्रे यांनी यावेळी दिलं. ते माध्यमांशी बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

राज ठाकरेंनी मागणी करून काही मोठं काम केलं नाही- गुलाबराव पाटील

“राष्ट्रवादीत इनकमिंग सुरूच; भाजपच्या ‘या’ आमदाराचा असंख्य समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश”

“सरकारनं एकदा निर्णय घेतला की, समाधानीच रहायचं असतं”

केंद्र सरकारने आता तरी बघ्याची भूमिका सोडावी; राज्यातील अतिवृष्टीवरुन रोहित पवारांची टीका