Home पुणे राष्ट्रवादीलाच खिंडार पाडल्याशिवाय राहणा नाही; भाजप नेत्याचं राष्ट्रवादी नेत्याला जोरदार प्रत्युत्तर

राष्ट्रवादीलाच खिंडार पाडल्याशिवाय राहणा नाही; भाजप नेत्याचं राष्ट्रवादी नेत्याला जोरदार प्रत्युत्तर

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपचे 16 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असा दावा पुण्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे. यावरून आता भाजपने पलटवार केला आहे.

प्रशांत जगताप यांचा हा दावा हास्यास्पद असल्याचं भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी म्हटलं. तसेच येत्या काळात राष्ट्रवादीलाच खिंडार पडल्याशिवाय राहणार नसल्याचं म्हणत मुळीक यांनी जगताप यांच्या दाव्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

हे ही वाचा : अर्थसंकल्प नाही हा तर निवडणूक संकल्प; जयंत पाटलांची टीका

ज्या पक्षाचे महापालिकेत 40 ते 45 नगरसेवक आहे. त्या पक्षाचे शहराध्यक्ष हास्यास्पद वल्गना करत आहेत. जगतापांनी त्यांच्या पक्षातून भाजपमध्ये येण्याऱ्यांना थांबवून दाखवावं. आम्ही राष्ट्रवादीला खिंडार पाडल्याशिवाय राहणार नाही. प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठीच जगताप अशी वक्तव्ये करत आहेत. पण प्रसिद्धीत राहून सत्ता मिळवता येत नाही, असा टोलाही मुळीक यांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

“युवासेनेचा भाजपला दणका, ‘या’ नेत्यानं आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत हाती बांधलं शिवबंधन”

आता नारायण राणेंना देशातला कायदा माहिती पडला असेल; नितेश राणेंचा जामीनीवरुन शिवसेनेची टीका

औरंगाबादेत शिवसेनेचा भाजपाला मोठा धक्का; भाजपचे 4 नगरसेवक शिवसेनेत