कालपर्यंत लाव रे तो व्हिडिओ म्हणणारा माणूस, आज अचानक…; शिवसेनेचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

0
996

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या आपल्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. अशातच त्यांनी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

कालपर्यंत लावा रे तो व्हिडिओ म्हणणारा माणूस अचानक बंद कर रे तो व्हिडिओ पर्यंत कसा काय पोहचतो?, अशी टीका सुषमा अंधारे यांनी यावेळी केली.

हे ही वाचा : महाविकास आघाडी अजूनही घट्ट, तर मग महापालिका निवडणूका एकत्र लढणार का?; उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

कालपर्यंत भोंगे उतरवण्याची भाषा करणारे भोंग्याच्याबाबतीत अचानक एकदम शांत कसे झाले? राज ठाकरे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार वेगवेगळे मुद्दे उकरुन काढत असल्याचा आरोप देखील सुषमा अंधारे यांनी यावेळी केला.

दरम्यान, कालपर्यंत भोंगे उतरवण्याची भाषा करत होतात. अचानक भोंग्यांवरून सगळ शांत कसं झाल? भोंगे लावणारे लोक, हनुमान चालीसा वाचणारे लोक हे वेगवेगळे मुद्दे काढून हे ईडीचा गाजावाजा करणारे लोक हे सगळे लोक आता एकदम शांत झाले आहेत., अशी टीकाही सुषमा अंधारे यांनी यावेळी केली.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा आता मला पुढे घेऊन जायचा आहे”

तुम्ही शिवसेनेतून कसे बाहेर पडलात?; राज ठाकरेंनी केला मोठा खुलासा, म्हणाले…

मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच विधानभवनात झाले दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here