Home पुणे ‘माजी मंत्री म्हणू नका’ वक्तव्यामागचा इतिहास चंद्रकांत पाटलांनी सांगितला; म्हणाले…

‘माजी मंत्री म्हणू नका’ वक्तव्यामागचा इतिहास चंद्रकांत पाटलांनी सांगितला; म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : माजी मंत्री म्हणू नका, दोन तीन दिवसांत कळेल मला, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  यांनी केलेल्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात कसबा गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आज चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील यांना त्या वक्तव्यासंदर्भात विचारणा केली त्यावर, “मला माजी मंत्री म्हणून नका असं काही मी म्हणालो नव्हतो. एका प्रसंगावेळी माजी मंत्री बाळा भेगडेंना उद्देशून मी म्हणालो होतो, कोणीतरी ही क्लीप तयार केली आणि ती फिरवली, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

“प्रसंग असा आहे की, देहू इथल्या एका सलूनच्या उद्घाटनासाठी मी गेलो होतो, तिथे घोषणा सुरू होती की माजी मंत्री बाळासाहेब भेगडे यांनी पुढे यावे. तर त्यावर मी म्हणालो की अरे माजी काय म्हणतो चार दिवसाने ते आजी होतील. त्यामुळे त्यात मला माजी मंत्री म्हणून नका असं काही मी म्हणालो नव्हतो. एवढ्या छोट्या गावातही कोणीतरी ही क्लीप तयार केली आणि ती फिरवली. आता सामाजिक जीवनामध्ये एकदा तुमच्या नावाने बील लागलं की एकामागून एक घटना घडत असतात. आता एवढंच म्हणतो की त्यानिमित्ताने महाराष्ट्रात राजकीय चर्चा झाली. माझा कुठलाही हेतू असा नव्हता की मला माजी मंत्री म्हणू नका…, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या घडामोडी –

“भाजपला धक्का! राजकारणाला अलविदा म्हणणणारे माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश”

संजय राऊत काय ‘घेऊन’ बोलतात माहिती नाही; नारायण राणेंचा टोला

“मोठी बातमी! पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा”

“शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणाऱ्यांशी युती कशी करणार?”