मुंबई : सरकारने तुझं माझं करण्यापेक्षा मराठा आरक्षण प्रश्न सोडवावा, असं म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सराकारवर टीका केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
मराठा समजाच्या आरक्षणाच्या मागणीचा मुद्दा ऐरणीवर आली आहे. उच्च न्यायालायने मराठा समाजाला सामाजिक मागास असं सिद्ध केल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने याला स्थगिती दिली होती. आता 15 ते 25 मार्चला अंतिम सुनावणी होणार आहे. मी काही या वर्षीच आरक्षणाचा मुद्दा घेऊन समोर आलेलो नाही. 2007 पासून मी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. 2013 ला आझाद मैदानात माझ्या नेतृत्वात मोर्चा काढला होता. तेव्हा नारायण राणे समितीने दिलेलं आरक्षण टिकलं नाही, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
दरम्यान, 2013ला देखील मुंबईत जो महामोर्चा निघाला होता, तेव्हा मला व्यासपीठावर जावं लागलं होतं. तेव्हा मोर्चाला काहीतरी गालबोट लागू शकतं म्हणून मला आलेल्या लोकांना परत जाण्यास सांगावं लागलं होतं. पण, सरकारच्या भूमिकेत सुरूवातीपासूनच समन्वय नव्हता. वेळोवेळी सरकारची भूमिका बदलत गेली? काही ठोस नियोजन आहे की नाही? हे मला सरकारला विचारायचं आहे, असं संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
सौरव गांगुलीने केली ‘या’ युवा भारतीय खेळाडूची सेहवाग, युवराज आणि धोनी यांच्याशी तुलना
हे एक नंबर लबाड सरकार; चंद्रकांत पाटलांची ठाकरे सरकारवर टीका
पुण्यात लाॅकडाऊन नाही, मात्र कडक निर्बंध लागू करणार- अजित पवार
“मुख्यमंत्र्यांसाठी मी आमदारकी पणाला लावली; आता संजय राठोडांच्या जागी मला मंत्री करा”