सरकार कोणत्याही सणांविरोधात नाही तर कोरोनाच्या विरोधात- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
284

मुंबई : महाविकास आघाडी सरकार हे कोणत्याही सणांविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात आहे., असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनेही हेच सांगितले आहे. त्यांनी दहीहंडी आणि गणेशोत्सव काळात गर्दी टाळावी अशी सूचना राज्याला पत्र पाठवून केली आहे. जे आंदोलन करू इच्छितात त्यांना केंद्र सरकारचे हे पत्र आपल्याला दाखवायचे आहे. आपल्या बेशिस्त वागणुकीतून ते शिस्त पाळणाऱ्या लोकांचे जीवन ही अडचणीत आणत आहेत, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“गॅस सिलेंडरच्या किंमतीत भाववाढ केल्याबद्दल महागाई सम्राट मोदीजींचे मनःपूर्वक आभार”

महाराष्ट्रात कायदाराज नाही गुंडाराज सुरू; चित्रा वाघ यांची टीका

“…तर आपण परमनंट लॉकडाऊनमध्ये गेलो असतो”

“पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांशी युती नको, स्वबळावर सत्ता मिळवू”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here