मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठीच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र काँग्रेस हायकमांडकडून पक्षातील मंत्र्यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब न केल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर गेला आहे. मात्र आता मंत्रिमंडळ विस्ताराची नवीन तारीख समोर आली आहे.
30 डिसेंबरला महाविकास आघाडीच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. 30 डिसेंबरला दुपारी 1 वाजता शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षातील मंत्री शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाविकास आघाडीच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी 13 मंत्री असतील, तर काँग्रेसच्या वाट्याला 10 मंत्रिपदे येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्रिपदासाठी राष्ट्रवादीमधून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, जयंत पाटील आणि अजित पवार या तीन नेत्यांची नावे सामोर आली आहेत. मात्र उपमुख्यमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
-राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता म्हणतो… आमच्यासाठी अजित पवार हेच मुख्यमंत्री!
-पाकिस्तानी संघाने विराट कोहलीकडून शिकायला हवं- शोएब अख्तर
-शरद पवारांनी सोयीची भूमिका घेऊ नये, अन्यथा… देवेंद्र फडणवीस म्हणतात…
-झारखंडच्या जनतेने भाजपचा अहंकार धुळीस मिळवला- नवाब मलिक