आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आज देशातल्या पंजाब, उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड आणि गोवा या पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यामध्ये पंजाब वगळता सर्वच राज्यामध्ये भाजप आघाडीवर असल्याचं पहायला मिळालं. यावरून आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतिक्रिया दिली.
या विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप कार्यकर्ते आणि जनतेचं असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी यावेळी म्हटलं. मोठ्या विजयनानंतर योगी लखनऊतील प्रदेश कार्यालयात दाखल झाले. त्यावेळी फुलांची उधळण करत योगींचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी बोलताना योगींनी पंतप्रधानांच्या कामाचं काैतुक केलं.
हे ही वाचा : आता पहा, 11 तारखेला काय होतं ते; चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडी सरकारला इशारा
पंतप्रधान मोदींच्या यशस्वी नेतृत्वात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यात भाजपचं प्रचंड बहुमताचं सरकार बनत आहे. या सर्व राज्यात पंतप्रधान मोदींच्या विकास आणि सुशासनाला जनतेनं आशीर्वाद दिलाय. मी सर्वात प्रथम पंतप्रधान मोदी, भाजपाध्यक्ष, गृहमंत्री, संरक्षणमंत्री आणि सर्व नेत्यांचं हृदयपूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्या नेतृत्वात भाजप चार राज्यात पुन्हा आपली सत्ता आणण्यात यशस्वी ठरला. उत्तर प्रदेश सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष लागून होतं. आज भाजप आणि मित्र पक्ष उत्तर प्रदेशात प्रचंड बहुमताने विजयी झाले आहेत. या बहुमतासाठी उत्तर प्रदेशच्या जनतेचं अभिनंदन आणि आभार मानतो, असं योगी म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
शिवसेना आणि राष्ट्रवादीची एकत्र मतं नोटापेक्षा कमी; देवेंद्र फडणवीसांची टीका
“पंजाबमध्ये AAP जिंकल्याचं नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना दुख:”
जबतक महाराष्ट्र में शिवसेना का सुपडा साफ नहीं करता…; चित्रा वाघ यांनी शिवसेनेला डिवचलं