Home महत्वाच्या बातम्या ही तर सुरुवात आहे, आम्ही लढत राहू; आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास

ही तर सुरुवात आहे, आम्ही लढत राहू; आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास

मुंबई :  देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. या निवडणुकीत शिवसेनेला मोठं अपयश आल्याचं चित्र आहे. यावर शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

उत्तर प्रदेश आणि गोव्यात आम्हाला यश आलं नाही. पण ही तर सुरुवात आहे. सुरुवात करणं गरजेचं असतं. सर्वच पक्षाने कधी ना कधी सुरुवात केली होती. त्यामुळे आम्ही लढत राहू. इतर सर्व राज्यातील निवडणुका आण्ही लढवणार आहोत, या मतावर आम्ही ठाम आहोत. कधी तरी पर्याय म्हणून तिथे उभं राहू, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा : “उत्तर प्रदेश झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है” म्हणणाऱ्या भाजपा नेत्यांना शरद पवारांचं उत्तर; म्हणाले…

उत्तर प्रदेशाच्या निवडणुकांना वेगवेगळे कंगोरे आहेत. पंजाबमध्ये आप पर्याय म्हणून उभी राहिली आहे. बंगालमध्ये तृणमूल पर्याय बनली आहे. तशीच महाराष्ट्रात आघाडी पर्याय बनली आहे. देशात हे पर्याय येत आहेत, असं आदित्य ठाकरे यांनी म्हणाले आहेत.

लोकांना विश्वास बसणं गरजेचं होतं. शिवसेना ठामपणे उभी राहील. आता प्रत्येक निवडणूक लढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यामुळे लोकांसमोर सीरियसनेस वाढेल. पुढच्या काही निवडणुकात मतांच्या मार्फत दाखवलेला विश्वास वाढेल. ही सुरुवात होती. आधी तीन जागा लढवल्या. आता 11 लढवल्या. अजून लढवू. कधी ना कधी तरी यश येईल. अनेक पक्षांची अशीच सुरुवात झाली. सुरुवातीला लढताना त्यांचं अस्तित्व नगण्य होतं. आज ते देशात पसरले आहेत. सुरुवात कुठून तरी करावी लागते ती आम्ही केली आहे, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

 “पंजाबमध्ये AAP जिंकल्याचं नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना दुख:”

जबतक महाराष्ट्र में शिवसेना का सुपडा साफ नहीं करता…; चित्रा वाघ यांनी शिवसेनेला डिवचलं

शिवसेना जिथे जिथे जाते, तिथे डिपॉझिट जप्त होते; रावसाहेब दानवेंची टीका