मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद बोलावली. यावेळी बोलताना फडणवीसांनी केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला किती आर्थिक मदत केली त्याची माहिती दिली.
केंद्र सरकारने करोना काळात निधी उपलब्ध करुन दिला नाही असा आरोप राज्य सरकारने केला आहे. केंद्राने आत्तापर्यंत 5 हजार कोटींपेक्षा जास्त पैसे राज्याला दिले आहेत मात्र केंद्राने काहीही दिलेच नाही असं ठाकरे सरकारकडून भासवलं जातं आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
पीपीई किट, N-95 मास्क यांचाही पुरवठाही केंद्राने केला आहे. तसचं आत्तापर्यंत 28 हजार 104 कोटींचा निधी केंद्राने राज्य सरकारला उपलब्ध करुन दिला आहे. तरीही केंद्राने काहीही दिलं नाही असं भासवलं जातं आहे असंही फडणवीस म्हणाले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारला केंद्र सरकारनेच मदत केली आहे, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“… तर क्रिकेट खेळाडूंना क्वारंटाइन कशाला करायचं?”
चार वर्षांच्या मुलीला स्वप्निल जोशी आतापासूनच शिकवतोय ‘ही’ कला
आज सर्वांचं लक्ष फडणवीसांवर; काय बोलणार?
राज्य कसं चालवावं हे मुख्यमंत्र्यांना अद्याप जमत नाही- नारायण राणे