Home महाराष्ट्र आज सर्वांचं लक्ष फडणवीसांवर; काय बोलणार?

आज सर्वांचं लक्ष फडणवीसांवर; काय बोलणार?

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीमध्ये सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे तर दुसरीकडे राज्य सरकार अस्थिर करण्याचे विरोधकांचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी राज्यपालांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.

दरम्यानच्या काळात सत्तास्थापनेच्या वेळीही मातोश्रीची पायरी न चढलेल्या शरद पवार यांनी सोमवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मातोश्री बंगल्यावर भेट घेतली. त्यामुळेच राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

याचदरम्यान, कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात महाविकास आघाडीचं सरकार अपयशी ठरल्याची टीका गेल्या काही दिवसांपासून सतत विरोधीपक्षाकडून करण्यात येत आहे. राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत असताना दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज संध्याकाळी ४ वाजता पत्रकार परिषद पार पडणार आहे. त्यामुळे संपूर्ण राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ते काय बोलतील याकडे आता सर्वांचं लक्ष लागल्याचं दिसत आहे.

महत्वाच्या घडामोडी –

राज्य कसं चालवावं हे मुख्यमंत्र्यांना अद्याप जमत नाही- नारायण राणे

पॅकेजची रिकामी खोकी व विरोधकांची रिकामी डोकी कोरोना युद्धात अडथळे आणत आहेत-संजय राऊत

महाराष्ट्रात मजुरांनी उद्धव ठाकरे जिंदाबादच्या घोषणा दिलेल्या योगी आदित्यनाथांना आवडलं नसेल- संजय राऊत

अभिनेत्री माधुरी दिक्षीत धावली कामगारांच्या मदतीला