Home मनोरंजन चार वर्षांच्या मुलीला स्वप्निल जोशी आतापासूनच शिकवतोय ‘ही’ कला

चार वर्षांच्या मुलीला स्वप्निल जोशी आतापासूनच शिकवतोय ‘ही’ कला

मुंबई : सध्या कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउन चालू आहे. या लॉकडाउनमुळे सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनाच त्यांच्या कुटुंबीयांसोबत मनमुराद वेळ घालवण्याची संधी मिळत आहे. मात्र या वेळेचाही सदुपयोग कसा करायचा याचं नियोजन अनेकजण करत आहेत. अभिनेता स्वप्निल जोशीनेही लॉकडाउनच्या काळात त्याच्या चार वर्षांच्या मुलीला एक खास गोष्ट शिकवण्याचा निर्धार केला आहे.

स्वप्निलने लहानपणीच अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ‘रामायण’ या पौराणिक मालिकेत त्याने कुशची भूमिका साकारली होती. तेव्हा तो नऊ वर्षांचा होता. अभिनय क्षेत्रातील इतक्या वर्षांचा अनुभव तो आता मुलीला सांगत आहे. मायराला स्वप्निल लाइटिंग, कॅमेरा अँगल अशा छोट्या-मोठ्या गोष्टी आतापासूनच शिकवत आहे.

दरम्यान, याविषयी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत स्वप्नील म्हणाला, “माझ्या मुलीमध्ये अभिनयाची एक चुणूक आतापासूनच मला दिसते. माझ्याकडूनच तिला हा वारसा मिळाला आहे असं म्हणायला हरकत नाही. प्रतिभा जरी महत्त्वाची असली तरी सर्वसामान्य गोष्टी माहीत करून घेणंही गरजेचं आहे. त्यामुळे मी तिला या गोष्टी शिकवत आहे.

महत्वाच्या घडामोडी –

आज सर्वांचं लक्ष फडणवीसांवर; काय बोलणार?

राज्य कसं चालवावं हे मुख्यमंत्र्यांना अद्याप जमत नाही- नारायण राणे

पॅकेजची रिकामी खोकी व विरोधकांची रिकामी डोकी कोरोना युद्धात अडथळे आणत आहेत-संजय राऊत

महाराष्ट्रात मजुरांनी उद्धव ठाकरे जिंदाबादच्या घोषणा दिलेल्या योगी आदित्यनाथांना आवडलं नसेल- संजय राऊत