Home महाराष्ट्र राहुल गांधींच आजचं विधान स्वतःच्या जबाबदारीपासून पळणारं आहे- देवेंद्र फडणवीस

राहुल गांधींच आजचं विधान स्वतःच्या जबाबदारीपासून पळणारं आहे- देवेंद्र फडणवीस

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद बोलावली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

राहुल गांधी यांचं आजचं विधान अतिशय गंभीर आहे. स्वतःच्या जबाबदारीपासून पळणारं हे विधान आहे. त्यांच्या विधानावरून काँग्रेस पक्ष आपली जबाबदारी झटकून संपूर्ण दोष मुख्यमंत्र्यांवर आणि शिवसेनेवर ढकलण्याचा प्रयत्न करीत आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज्य सरकारमध्ये समन्वय नाही. या काळात खर्च कशावर झाला, हे पाहिले तर सरकारची प्राथमिकता काय हे दिसून येईल. सध्या लढाई करोनाविरुद्ध आहे. सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. ते स्वतःच्या अंतर्विरोधातून पडेल. सध्या करोनाच्या लढाईतून लक्ष विचलित करण्यासाठी, माध्यमांचं लक्ष इतरत्र वळवण्यासाठी अशा बातम्या दिल्या जात आहेत, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारला आमचा पाठिंबा आहे. मात्र आम्ही मुख्य निर्णयकर्ते नाहीत. आम्ही पंजाब, छत्तीसगड, राजस्थान या राज्यांमध्ये मुख्य निर्णयकर्ते आहोत. सरकार चालवणं आणि सरकारला पाठिंबा देणं हा यातला फरक आहे, असं विधान राहुल गांधींनी केलं होतं.

महत्वाच्या घडामोडी –

“केंद्र सरकारने राज्स सरकारला आत्तापर्यंत केली ‘इतक्या’ हजार कोटींची मदत”

“… तर क्रिकेट खेळाडूंना क्वारंटाइन कशाला करायचं?”

चार वर्षांच्या मुलीला स्वप्निल जोशी आतापासूनच शिकवतोय ‘ही’ कला

आज सर्वांचं लक्ष फडणवीसांवर; काय बोलणार?