Home महाराष्ट्र पवारांच्या घरावरील हल्ल्याची निष्पक्षपणे चाैकशी व्हावी- रामदास आठवले

पवारांच्या घरावरील हल्ल्याची निष्पक्षपणे चाैकशी व्हावी- रामदास आठवले

298

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सातारा : राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी पाच महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईमधील सिल्व्हर ओक या निवास्थानाबाहेर आंदोलन सुरू केलं. यावेळी काही कर्मचाऱ्यांनी पवारांच्या निवासस्थानावर चपला देखील फेकल्या. यावरून केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली.

खासदार शरद पवार यांच्या घरावरील हल्ला दुर्दैवी असून मुळात एसटी कर्मचाऱ्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करायला हवं होतं. या प्रकाराला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकारच जबाबदार असून या हल्ल्याची निष्पक्षपणे चौकशी व्हावी, असं मत रामदास आठवलेंनी यावेळी व्यक्त केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमासाठी रामदास आठवले जिल्ह्यात आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

हे ही वाचा : नागाणं फणा काढावा, असा चेहरा आहे म्हणणाऱ्या राज ठाकरेंना जितेंद्र आव्हाडांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाले…

दरम्यान, कोल्हापूर पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा विजयी निश्चित आहे, असा विश्वासही रामदास आठवलेंनी यावेळी व्यक्त केला.

महत्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंची प्रकृती बिघडली, अतिदक्षता विभागात उपचार सूरू”

कमळाचा चिखल गेला कोठे?; किशोरी पेडणेकरांचा किरीट सोमय्यांवर निशाणा

शरद पवार स्वत: नास्तिक आहेत, त्यामुळे…; राज ठाकरेंचा थेट शरद पवारांवर निशाणा