मुंबई : नाशिकमध्ये व्हेंटिलेटर बेड वेळेवर मिळत नसल्याने अनेक कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू होत असताना, दुसरीकडे मात्र नाशिकला पीएम केअर फंडातून 60 व्हेंटिलेटर मिळूनही ते जोडणी अभावी अजून ही बिटको रुग्णालयात धूळखात पडून असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
केंद्र सरकारच्या नावाने रोज ठणाणा करायचा आणि जे मिळालंय त्याची अशी नासाडी करायची तूर डाळ असो वा व्हेंटिलेटर. ठाकरे सरकार, निकम्मा कारभार., असं ट्विट करत भातखळकरांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
केंद्र सरकारच्या नावाने रोज ठणाणा करायचा आणि जे मिळालंय त्याची अशी नासाडी करायची तूर डाळ असो वा व्हेंटिलेटर.
ठाकरे सरकार, निकम्मा कारभार.https://t.co/LXwmwzT7cR— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 8, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“मी 96 कुळी मराठा, कोणाच्या आव्हानाला भीक घालत नाही”
“हसन मुश्रीफांनी माझ्यावर खुशाल अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा, मी त्याला घाबरत नाही”
कोरोना लसीकरणासाठी महाराष्ट्राचं स्वत:चं अॅप तयार होणार- किशोरी पेडणेकर
“अभिनेत्री कंगणा रणाैतला कोरोनाची लागण”