Home महाराष्ट्र “मी 96 कुळी मराठा, कोणाच्या आव्हानाला भीक घालत नाही”

“मी 96 कुळी मराठा, कोणाच्या आव्हानाला भीक घालत नाही”

सातारा : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्याने महाविकास आघाडीवर विरोधकांकडून टीका होत आहे. 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाचे समर्थन करणारी कोणतीही असामान्य परिस्थिती दिसत नसल्याने हे आरक्षण घटनाबाह्य असल्याचं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं. याच पार्श्वभूमीवर माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयावर दगडफेक करणाऱ्या युवकांना आमदार शशिकांत शिंदे यांनी धमकावले आहे. यामुळे त्या युवकांच्या जीवाला धोका असून त्यांना पोलिस संरक्षण देण्याची गरज आहे. पोलिसांनी संरक्षण देतानाच त्या युवकांच्या कुटुंबियांची तक्रार नोंदवून घ्यावी, त्यांनी तक्रार न दिल्यास पोलिसांनी पुढाकार घेत स्वत: शशिकांत शिंदे यांच्याविरोधात तक्रार नोंदविण्याची मागणी नरेंद्र पाटील यांनी केली होती. या आरोपांवर स्वत: आमदार शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मी 96 कुळी मराठा आहे का नाही, हे मला व राज्यातील मराठा समाजातील नेत्यांना व तरुणांना माहीत आहे. मी कधीही मराठा समाजाचे भावनिक राजकारण केले नाही. या समाजासाठी मी प्रामाणिकपणे काम करत आहे. ज्यावेळी मराठा आरक्षणासाठी आंदोलने झाली. त्या त्या वेळी प्युअर मराठा म्हणून आंदोलनात अगदी आझाद मैदानापर्यंत सहभागी झालो होतो, असं शशिकांत शिंदे म्हणाले.

दरम्यान, सातारा जिल्ह्यात असो, नवी मुंबईत, कळंबोली असो अनेक ठिकाणी मराठा तरुणांना अटक झाली, ते अडचणीत आले. त्या वेळी मी पुढाकार घेऊन त्यांना मदत केली आहे., असंही शशिकांत शिंदे यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“हसन मुश्रीफांनी माझ्यावर खुशाल अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा, मी त्याला घाबरत नाही”

कोरोना लसीकरणासाठी महाराष्ट्राचं स्वत:चं अॅप तयार होणार- किशोरी पेडणेकर

“अभिनेत्री कंगणा रणाैतला कोरोनाची लागण”

शरद पवारांनी बार मालकांसाठी केलेल्या सवलतीची मागणीवरुन अतुल भातखळकारांचा टोला; म्हणाले…