Home महाराष्ट्र “हसन मुश्रीफांनी माझ्यावर खुशाल अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा, मी त्याला घाबरत नाही”

“हसन मुश्रीफांनी माझ्यावर खुशाल अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा, मी त्याला घाबरत नाही”

कोल्हापूर : काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यासंदर्भात एक वक्तव्य केलं होतं. तुम्ही जामिनावर बाहेर आहात, त्यामुळे सांभाळून बोला, असा इशारा चंद्रकांत पाटलांनी दिला होता. यावर हसन मुश्रीफ यांनी, लोकशाहीमध्ये अशाप्रकारे धमकावणे योग्य नाही. गेल्यावेळीही चंद्रकांत पाटील यांनी आमचा अपमान केला होता. त्यामुळे आता मी त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी म्हटलं होतं. यावर चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

हसन मुश्रीफ यांनी माझ्यावर खुशाल अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा. मी त्याला घाबरत नाही. जरी माझी सर्व प्रॉपर्टी विकली तर 100 कोटी काय 1 कोटीही मिळणार नाहीत. त्यामुळे हा खटला हसन मुश्रीफ यांनी जिंकला तर त्यांना मलाच विकावं लागेल, असा पलटवार चंद्रकांत पाटलांनी यावेळी केला.

दरम्यान, चंद्रकांत पाटील हे आज कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

कोरोना लसीकरणासाठी महाराष्ट्राचं स्वत:चं अॅप तयार होणार- किशोरी पेडणेकर

“अभिनेत्री कंगणा रणाैतला कोरोनाची लागण”

शरद पवारांनी बार मालकांसाठी केलेल्या सवलतीची मागणीवरुन अतुल भातखळकारांचा टोला; म्हणाले…

शरद पवारांच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; म्हणाले..