काँग्रेसचा ‘हा’ नेता म्हणतो; राज ठाकरेंनी मनसेचं इंजिन भाजपला भाड्याने दिलं आहे

0
344

मुंबई : मुंबईत बेकायदेशीररित्या राहणाऱ्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात आज मनसेनं मोर्चा काढला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीचे समर्थन केलं. यावरुन काँग्रेसने राज ठाकरेंवर टीका केली आहे.

राज ठाकरे यांनी मनसेचे इंजिन भाजपला भाड्याने दिलं आहे. अशी टीका करत काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्विट करून राज यांच्यावर निशाणा साधला.

राजकारण व्यवसाय समजला की भूमिका, झेंडे आणि भाषा बदलतेच. भूमिका केवळ वैयक्तिक नफा- नुकसान पाहून घेतल्या की मग मोर्चे काढा किंवा चिथावणीखोर भाषणे करा जनतेच्या दृष्टीने त्यांची किंमत शून्य असते, असं सचिन सावंत म्हणाले.

भाजपाच्या “धार्मिक-द्वेष एक्स्प्रेस” करिता मनसेने इंजिन भाड्यावर दिलं पण इथेही ते फेल होईल, असंही सावंत यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here